ऊर्जा बचतीबद्दल तळागाळातील महिलांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी पुण्यातील तेर पॉलिसी सेंटरच्या पुढाकाराने आंतरराष्ट्रीय पातळीवर वुमन अँड एनर्जी अलायन्सची स्थापना करण्यात आली आहे. या अंतर्गत भारत, तुर्की आणि नायझेरियामधील स्वयंसेवी संस्था एकत्र आल्या असून, ग्रामीण भागातील महिलांना कार्बन उत्सर्जन, हवामान बदलांविषयो सोप्या शब्दांमध्ये मार्गदर्शन करून ऊर्जा बचतीची चळवळ उभारण्यात येणार आहे. पॅरिस परिषदेत तेर पॉलिस सेंटरतर्फे ‘वुमन जेंडर इक्वालिटी अँड क्लायमेट चेंज’ या विषयावर परिसंवाद आयोजिण्यात आला होता. पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर, तेर पॉलिसी सेंटरचे संचालक राजेंद्र शेंडे, अध्यक्षा डॉ. विनिता आपटे, तुर्कीच्या एनर्जी इफिशियन्सी असोसिएशनच्या उपाध्यक्षा सफाक मर्डिरिसगील, अर्थ डे नेटवर्कच्या करुणा सिंग, उपस्थित होत्या.
डॉ. आपटे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.