पर्यावरण व अपारंपरिक उर्जेचे संवर्धन या क्षेत्रात दिलेल्या योगदाना बद्दल पुण्यातील तेर पॉलिसी सेंटरच्या संचालिका डॉ. विनिता आपटे यांचा इंडियन अचिव्हर अवार्डने नुकताच गौरव करण्यात आला.
इंडियन अचिव्हर फोरमच्या वतीने या पुरस्कार साठी विमेन ऑफ एक्सलंस विभागात देशपातळीवर डॉ. आपटे यांची निवड करण्यात आली.
कार्पोरेट, खेळ, तंत्रद्यान, विज्ञान नाविण्यापुर्वक उपक्रम उद्योजकता सामाजिक कार्य कला, मनोरंजन, पर्यटन, आरोग्य सेवा, शिक्षण यासारख्या विविध क्षेत्रात जागरूकता निर्माण करीत उलेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा इंडियन अचिव्हर फोरामच्यावातीने पुरस्कार देत सन्मान करण्यात येतो. याच पुरस्काराने या वर्षी तेर पॉलिसी सेंटर या पुण्यातील स्वयंमसेवी संस्थेची स्थापना करण्याऱ्या डॉ. विनिता आपटे यांचा सन्मान करण्यात आला.
पर्यावरण व अपारंपारिक ऊर्जा संवर्धन संदर्भात नागरिकांमध्ये जागृती निर्माण करणे. त्यांना याविषयीचे प्रशिक्षण देने यासाठी डॉ. विनिता आपटे या गेली अनेक वर्ष कार्यरत आहेत. आपल्या तेर पॉलिसी सेंटरच्या माध्यमातून त्या सामान्य नागरिक, सामाजिक संस्था व कार्पोरेट कार्यालये आदी ठिकाणी जागरूकता निर्माण कण्याचे काम करतात. या खेरीज त्यांनी
कंपन्याच्या सामाजिक निधीच्या माध्यमातून ग्रामीण आणि शहरी भागात सौरुर्ज्या व जैव विविधता याच्याशी संबंधित अनेक प्रकल्प यशस्वीपणे उभारले आहेत.प्रयावार्नाशी संबधित हे विषय महिला व नव्या तरुण’ पिढी पर्यंत पोहचवण्याच्या हेतूने त्यांनी तेर पोलिसी सेंटर या साव्थेची स्थापना केली.सध्या त्याच्या मार्गदर्शनाखाली सावस्था अन्नसुरक्षा, अपारंपरिक उर्जेची कार्य्शामता ,मायक्रो ग्रीडार्स,सेंद्रियशेती शेती संवर्धन हवामान बदल कचरा व्यवस्थापन नधी सुधारणा आदी अनेक विषयांवर कार्यरत आहे. यूनाईटेड नेशनच्या पर्यावरण विभागात सुरुवातीच्या काळातील माध्यमे व सोशल मिडिया यांची रणनीती ठरविण्यासाठी डॉ. विनिता आपटे यांनी परीस येथे देखील काम केले आहे.
२०१० सालापासून हवामान बदलासाठी होणार्या प्रत्येक परिषदेमध्ये डॉ. विनिता आपटे युएनडीसीसी आणि ईएससीओएसओसी या अद्वोइजर म्हणून सहभागी असतात. २०१५ ची परीस परिषद मरकेश, बान येथे झालेल्या परिषदामधेही महिला व पर्यावरण, वनीकरण, रेड प्लस आदी विषयावर आयोजित परिसंवादात त्या सहभागी झाल्या होत्या.