तेर पॉलिसी सेंटर या पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थेने वसुंधरा दिनानिमित्त ‘साद वसुंधरेची’ या अभिनव कार्यक्रमाचे नुकतेच आयोजन केले होते.
तेर म्हणजे फ्रेंच भाषेत पृथ्वी, पृथ्वीच्या व्युत्पत्तीपासून सुरुवात करून नृत्य, अभिवाचन, गायन यातून मनोरंजन आणि प्रबोधन या कार्यक्रमात करण्यात आले. धनश्री गणात्रा, रवींद्र शाळू यांनी गायनातून पृथ्वीची विविध रूपे दाखवली. लीना केतकर ‘यांनी कथक नृत्याच्या माध्यमातून ‘पंचामहाभूतांना आवाहन केले.
अभिनेते राहुल सोलापूरकर व डॉ. विनिता आपटे यांनी पृथ्वी, पर्यावरणातील बदल, काही गोष्टींचे कथन, अभिवाचन व निवेदन यातून कार्यक्रमाची रंगत वाढवली, वसुंधरा दिनानिमित्त अशा अभिनव मैफिलीचा शेवट ‘तेर’ ने बनवलेल्या वसुंधरा गीताने झाला.