पर्यावरण आणि अपारंपरिक ऊर्जेचे संवर्धन या क्षेत्रांतील उल्लेखनीय कार्याबद्दल तेर पॉलिसी सेंटरच्या विनिता आपटे संचालिका डॉ. विनिता आपटे यांचा ‘इंडियन अचिव्हर अँवॉर्ड’ ने नुकताच गौरव करण्यात आला.
“इंडियन अचिव्हस फोरम’ तर्फे ‘विमेन ऑफ एक्सलन्स’ या विभागाअंतर्गत डॉ. आपटे यांची निवड करण्यात आली. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान आणि त्यांचे कार्य अधिकाधिक लोकांपर्यंत ‘पोहोचविण्याच्या उद्देशाने पुरस्कार दिला जातो. डॉ. आपटे यांनी पर्यावरण, अपारंपिक उर्जा संवर्धन आणि जलसंधारण, वृक्ष संवर्धनाशी निगडीत अनेक प्रकल्प राबवले आहेत. डॉ. आपटे यांनी प्यारीसमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण विभागामध्ये माध्यमे आणि जनजागृती या प्रकल्पावर काम केले आहे.