वातावरणात होत असलेले बदल पाहता आणि भविष्यातील ग्लोबल वोर्मिन्ग्चा धोका पाहता सर्वसामान्यामध्ये याबद्दल जनजागृती आवश्क असल्याचे मत संयुक्तराष्ट्र पर्यावरण कार्यक्रम ओझोन कृती विभागाच्या सल्लागार विनिता आपटे यांनी व्यक्त केले.
लेह, चीन ,रशिया, आस्ट्रेलिया या ठिकाणी वातावरणात होत असलेले बदल आणि नैसर्गिक आपत्ती याविषयी बोलताना त्या म्हणाल्या, विकसनशील राष्ट्रात याबद्दल कृती कार्यक्रमाची गरज आहे.
प्रसार माध्यमानी याबाबात महत्वाचे पाउल उचलावे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या पर्यावरण कार्यकमात, ओझोन कृती विभागाच्या वतीने विविध कार्यक्रम चर्चासत्राचे आयोजन करण्यात येते. त्यायोगे ओझोनेविषयी लोकांना माहिती देणे हा प्रमुख उद्धेश असतो.
तेर या संस्थेच्यावतीने पर्यावरण जागृतीबाबत विशेष प्रयत्न केले जात आहेत, त्या अनुषंगाने येत्या १५ व १६ सप्टेंबर रोजी पुण्यात परिषदेचे आयोजन करण्यार आल्याचेही त्यांनी सांगितले.
तेर संस्थेच्यावतीने जागतिक स्तरावर ओझोने कृती विषयी असलेले बदल त्यासाठी केले जात असलेले प्रयत्न याबद्दल माहिती दिली जाते. लोकांमध्ये जागृती आण्यासाठी हि संस्था प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितले.