पर्यावरण आणि अपारंपरिक ऊर्जेचे संवर्धन या क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल तेर पॉलिसी सेंटरच्या संचालिका डॉ. विनिता आपटे यांचा ‘इंडियन अचिव्हर अँवॉर्ड’ ने नुकताच सन्मान करण्यात आला. या पुरस्कारासाठी “वुमेन ऑफ एक्सलन्स’ विभागात देशपातळीवर डॉ. आपटे यांची निवड करण्यात आली.
पर्यावरण आणि अपारंपरिक ऊर्जा संबर्धनासंदर्भात जागृती निर्माण करणे, त्यांना याविषयीचे प्रशिक्षण देणे यासाठी आपटे गेली अनेक वर्षे कार्यरत आहेत. तेर पॉलिसी सेंटरच्या माध्यातून त्या सामान्य नागरिक, सामाजिक संस्था आणि कॉर्पेरिट कार्यालयांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचे काम करतात.