पुण्यातील पर्यावरण क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या ‘तेर’ पॉलिसी सेंटर संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा डॉ. विनिता आपटे यांना शनिवारी महात्मा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. जगभरात जे वैयक्तिक स्तरावर तसेच ज्या संस्था समाजासाठी महत्त्वपूर्ण विनिता आपटे व भरीव कामगिरी करतात, त्यांच्या कामाची ‘जागतिकस्तरावर ओळख व्हावी म्हणून महात्मा पुरस्कार समितीद्वारे आंतरराष्ट्रीय पातळीवरील ‘महात्मा पुरस्कार’ प्रदान करण्यात येतो. महात्मा पुरस्कार सामाजिक उद्योजक आणि समाजसेवक अमित सचदेव यांनी स्थापित केला आहे. लाइव्ह वीक ग्रुपतर्फे हा पुरस्कार देण्यात आला आहे.
जीन्दल स्टील फाउंडेशनच्या अध्यक्ष शेलू जीन्दल यांच्या हस्ते पुरस्कार वितरण दिल्ली येथे झाले. तेर पॉलिसी सेंटर हवामान बदल, पर्यावरण या क्षेत्रात काम करणारी पुण्यातील अग्रगण्य संस्था आहे. द्या संस्थेदवा गेल्या काही वर्षात पुण्यासह महाराष्ट्रात हजारो वृक्ष लावून त्याची जोपासना केली जात आहे. संस्थेने पर्यावरण जागरूकतेसाठी राष्ट्रस्तरावर विद्यार्थ्यांसाठी ऑलम्पियाड सुरू केली असून दरवर्षी विद्यार्थी यात सहभागी होत असतात.